Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ.

निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 24, सप्टेंबर :-  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे .यासाठी डॉ.संजय ओक टास्क फोर्स सदस्य,पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने ,माजी अधिष्ठता (से.नि) जे.जे रुग्णालय, मुंबई , डॉ.संगिता रावत अधिष्ठता, के.ई.एम. रुग्णालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ अर्ज सादर करता यावेत यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती अधिक सुलभ केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या कक्षाचे काम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार या कक्षाचे अँप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

या बैठकीत खारगे यांनी कक्षाचा कामाचा आढावा घेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या. निधी कक्षाचे प्रमुख चिवटे यांनी बैठकीत सांगितले की, ऑनलाईन एप्लिकेशन तसेच वेबसाईट द्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपलब्ध होणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मोबाईल अँप्लिकेशन तसेच मदत व मार्गदर्शनासाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरु करण्यात येईल.
तसेच योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय जिल्हा रूग्णालयांचे शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठता यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वैद्यकीय सहाय्यता निधीमधील रुग्णालयांची संख्या वाढविणार

राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना सहाय्यता उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश (पॅनल) करण्यात येणार आहेत. याकरीता रूग्णालयाने अर्ज सादर करावे यासाठी रूग्णालयांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच रुग्णांलयांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पोहचवा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे  चिवटे यांनी सांगितले.

तसेच या बैठकीत लेखाधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी डॉ.आनंद बंग आरोग्य विषयक सल्लागार, डॉ.रागिणी पारेख अधिष्ठता,सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.कैलास पवार जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे ,
डॉ.बी.एस.नागावकर मुख्य वैद्यकीय सल्लागार,महात्मा ज्योतिबा फुले जन. आरोग्य योजना, मुंबई (से.नि.), डॉ.मोहन जोशी अधिष्ठता, सायन रुग्णालय, मुंबई, डॉ.संजय सुरासे अधिक्षक, सर जे.जे रुग्णालय, मुंबई,
डॉ.प्रविण बांगर मुख्य वैद्यकीय अधिकारी, के.ई.एम.रुग्णालय, मुंबई, डॉ.अविनाश गुटे सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.अरुण राठोड ,सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.दिनेश धोंडी , सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.दिलीप गवारे, सर जे.जे.रुग्णालय, मुंबई,डॉ.ममता जवादे राज्य कामगार विमा सेवा, मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

रविवारी होणार प्रवाशांचे हाल…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक.

गुलाल उधळत या, मात्र शिस्तीत या – उद्धव ठाकरे

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.