Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

११ बालकाच्या जळीत दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा, १० जानेवारी :  ९ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केयर (SNCU) विभागात आग लागून ११ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला १ वर्ष पूर्ण झाला आहे, या घटनेतील दोषींवर ठोस कार्यवाही झाली न झाल्याने पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तर या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय अत्याधुनिक फायर यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज झाला आहे. लवकरच हे सुसज्य युनिट कार्यरत होईल असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या २०२१ मध्यरात्री २ वाजेला रुग्णालयातील नवजात शिशु केयर युनिट च्या विभागात आग लागून १० नवजात बालकांचा होरपडून मृत्यू झाला होता. तर एक बालकांचं उपचारा दरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला होता. एकूण ११ नवजात बालकांना या दुर्दैवी घटनेत आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेले. राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यापासून तर विरोधी पक्ष नेते सर्वच नेत्यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी यांनी समिती गठीत केली. समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्हा शल्य चिकित्सक निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निलंबन करून त्यांची बदली करण्यात आली तर बाल रोग तज्ञ डॉक्टर व दोन कंत्राटी नर्सेस वर बडतर्फीची कारवाई करण्यात आली निलंबित करण्यात आले. तब्बल ३९ दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सेसवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर शासकीय आरोग्य कर्मचारी इतर कर्मचारी आणि राजकीय लोक हे आमच्या घरी भेटीस आले. कुठलीही गरज लागली तर मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र एक-दोन महिन्यानंतर यापैकी कोणीही येत नाही किंवा आमची विचारपूस करीत नाही. केवळ घटना घडल्या नंतर देखावा करण्यासाठी ही सर्व येतात. घटनेनंतर केवळ कंत्राटी कामगारांवर बडतर्फीची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. पण जे दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर का गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कुठेतरी सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करून दोषी डॉक्टराना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडित मातांनी केला आहे. आम्हाला अपेक्षित न्याय मिळाला नाही, आम्ही अजूनही न्यायाच्या प प्रतीक्षेत आहोत असं या पीडित आईने सांगितले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भंडारा रुग्णालय जाळीत प्रकरणाच्या दरम्यान दोन नर्सेस यांनी कर्तव्यावर असताना सुद्धा आउट बॉर्न आणि इन बॉर्न या ठिकाणी उपस्थित नव्हत्या त्यामुळे या नर्सेसना आग लागल्याची माहिती लगेच मिळाली नाही असे सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.
रुग्णालयात दोन बाळांच्या मागे एक नर्स असायला पाहिजेत होती, मात्र या ठिकाणि १७ बाळांच्या मागे दोनच नर्स कर्तव्यावर होत्या. त्या मुळे या कंत्राटी नर्सेसवर अन्याय झालं असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संपूर्ण रुग्णालयात अत्याधुनिक फायर सिस्टम बसविण्यात आले असून ७० च्या वर तापमान गेल्यास आपोआप स्प्रिंकल सुरू होतील. तसेच आतापर्यंत केवळ २५० किलो वॅट चे ट्रांसफार्मर होते ते बदलून आता ६५० किलोवॅट चे नवीन ट्रांसफार्मर बसविण्यात आले आहे. नवीन गॅस पाईप,नवीन व्हार्मर बसविण्यात आले असून नवीन इलेक्ट्रिक वायर बसविण्याचा काम अंतिम टप्यात असून येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण यंत्रणा सुरु होणार आहे. आतापर्यंत दोनदा मॉकड्रील झाली असून भविष्यात अशा दुर्घटना झाल्यास आपली संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे सज्जे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

पालघरच्या धुंदलवाडीमध्ये पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाटन..

कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

 

Comments are closed.