Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ९ जानेवारी : कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कधी होणार परीक्षा?

पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा या १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. आता या परीक्षा १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. तर पदवीच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार होत्या. आता या परीक्षा २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. कदाचित कोरोना प्रकोप वाढल्यास या परीक्षाही ऐनवळी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

१ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात

“या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती

 

 

Comments are closed.