Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१५ वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि.३० जून : अर्थ व सांख्यिकी संचालनालया अंतर्गत जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पद्धतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ डॉ. प्रशांतचंद्र महालनोबोस यांचा २९ जून हा जन्मदिवस १५ वा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे आयोजित कार्यक्रमात विभिन्न विषयाप्रमाणे यावर्षी राष्ट्रीय साख्यिकी दिनाचा विषय “श्वाश्वत विकास ध्येय – २” उपासमार नष्ट करणे, अन्न सुरक्षा व सुधारीत पोषण आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रम ते. श्रा. तिडके, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडला.

या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून अ. द. गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी, (मानव विकास) हे लाभले. ” श्वाश्वत विकास ध्येय -२” विषयाचे अनुषंगाने अ. द. गोतमारे यांनी प्रस्तुत विषयावर आपले मनोगत व्यक्त करतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषयातील ठराविक ध्येय कसे पूर्ण करता येईल यावर विषेश भर देऊन विषयाबाबत आयोजित सांख्यिकी दिनाचे महत्व पटवून दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तिडके, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सांख्यिकीय माहितीचा वापर करून सदर ध्येय कसे साध्य करता येईल याबाबत मार्गदर्शन करतांना पिक लागवडीचे नियोजन तसेच युवा पिढीकरीता कौशल्य विकास अंतर्गत विविध बाबी उपलब्ध करून दिल्यास सामाजिक राहाणीमानात व आर्थिक विकासात कशाप्रकारे बदल घडवून येईल याबाबतचे महत्व पटवून दिले.

तसेच जिल्हा सांख्यिकी अधिकारी रमेश पेरगु यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शाश्वत विकास ध्येय – २ या विषयातील महत्वाचा मुद्दा उपासमारी/भूकमारी नष्ट करणे यावर विषेश लक्ष वेधून हे ध्येय साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवून दिलेले ८ लक्ष्ये व त्याबाबतचे निर्देशक द्वारे सन २०३० पर्यंत हे ध्येय साध्य करणे शक्य होईल किंवा कसे याबाबत मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सांख्यिकी दिन कार्यक्रमासाठी संचालनालया अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, सागर पाटिल व रागीनी लांजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विशाल मडके, संशोधन सहायक व मंगेश निर, सांख्यिकी सहायक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे देखील वाचा : 

गोरगुट्टा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी

जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी

नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी

Comments are closed.