Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 30 जून : पैडी जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र कोटमी, जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 21 मे 2021 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना पेडी जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात सहा पुरुष व सात महिलांचे मृतदेह सापडल्याने सदर मृत्यूचे कारण तपास करणेकामी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, सुरु केली असून सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करावयाची आहे. तरी वरील घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी, प्रत्यक्षदर्शी चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे समक्ष शपथेवर जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एटापल्ली मनूज जिंदल यांनी कळविले आहे.

चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे. घटनेचे आपण पाहिल्याप्रमाणे वर्णन, आपला या घटने विषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी म्हणणे, या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

गोरगुट्टा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी

राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

 

Comments are closed.