Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्वानाच्या शिकारीसाठी गेलेला बिबट्या पडला विहिरीत,श्वान व बिबट्या दोघेही जिवंत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावती १४ ऑगस्ट : अमरावती शहरालगत बिबट्यानच वास्तव्य वाढत चाललेले आहे,मानवी वस्तीपर्तंत बिबट्याचा शिरकाव झाला आहे.  बडनेरा – अंजणगाव मार्गावर अंबाडकर यांच्या शेतात काल रात्री बिबट्या श्र्वानाची शिकार करताना श्वान व बिबट्या दोघेजण या विहिरीत पडले. विहिरीत असलेल्या एका लाकडावर  श्वान आणि बिबट्या दोघेजण आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहे. देवेश अंबाळकर हा युवक जेव्हा सकाळी शेतात गेला त्यावेळी त्याला आपल्या शेतातील विहिरीत बिबट्या व श्वान दोघे जिवंत असल्याची घटना उघडकीस आली.

बिबट्या व श्वान दोघेही वाचण्यासाठी आपला जीव वाचवण्याची धडपड करत आहे,विहिरीत असलेल्या एका लाकडावर दोघेही बसले असल्याच दिसते.विहिरीत सध्या 20 फुटाच्या वर पाणी आहे.दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली वन विभागाची टीम व गावकरी या दोघांनाही काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

गडचिरोली पोलीस दलातील 21 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाची घोषणा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश

 

मी बीडचा डॉन .. पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत म्हणत गुंडाचा ठाण्यात धुडगूस संगणकाची तोडफोड

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.