Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलातील 21 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १४ ऑगस्ट : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडुन सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील 21 अधि./अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार 1) अपर पोलीस अधी.- मंजुनाथ हुचप्पा सिंगे भापोसे. 2) अपर पोलीस अधी.- हरी बालाजी एन. भापोसे. 3) डिवायएसपी- नवनाथ ठकाजी ढवळे 4) सपोनि- योगेश देवराम पाटिल 5) पीएसआय- सुदर्शन सुरेश काटकर 6) पोहवा/लिंगनाथ ननैय्या पोरतेट 7) पोहवा/ रोहिदास सिलुजी निकुरे 8) नापोशि/ अरविंद कुमार पुरनशाह मडावी 9) नापोशि/मोरेश्वर पत्रु वेलादी 10) नापोशि/प्रविण प्रकाशराव कुलसाम 11) नापोशि/ सडवली शंकर आसाम 12) नापोशि/ आशिष देविलाल चव्हाण 13) पोशि/ बिच्चु पोचय्या सिडाम 14) पोशि/शामसाय ताराचंद कोडापे 15) पोशि/ नितेश गंगाराम वेलादी 16) पोशि/ पंकज सिताराम हलामी 17) पोशि/ आदित्य रविंद्र मडावी 18) पोशि/ रामभाऊ मनुजी हिचामी 19) पोशि/ मंगलशाह जीवन मडावी 20) पोशि/ ज्ञानेश्वर देवराम गावडे 21) पोशि/ शिवा पुंडलिक गोरले तसेच सपोनि. मोतिराम बक्काजी मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे वतीने त्यांचे   पोलीस अधीक्षक   यांनी  कौतुक केले असुन त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश

मी बीडचा डॉन .. पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत म्हणत गुंडाचा ठाण्यात धुडगूस संगणकाची तोडफोड

 

 

मन्नेवार समाजाच्या स्मशान भूमीतील शेडचे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

Comments are closed.