Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश

जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केला सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १४ ऑगस्ट : देवलमरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी  कॉंग्रेसला गळती लागली असून चार दिवसात चार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या  ग्रापं सदस्यांनी  पक्षाला रामराम ठोकत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला आहे .त्यामुळे राष्ट्रवादी  कॉंग्रेसचा बालेकिल्ला  समजल्या जाणाऱ्या देवलमरीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला खिंडार पाडले आहे .यामागे पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजी  हे कारण असल्याचे कळते .आगामी काळात  अहेरी विधानसभा क्षेत्रात पक्ष नेतृत्वाबद्दल नाराज असलेले  मोठ्या प्रमाणात सदस्य व कार्यकर्ते आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वाटेवर असल्याची माहिती आतील गोटातून मिळत आहे .

देवलमरी ग्रामपंचायतचे तीन सदस्य  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते   बहुमत असल्याने देवलमरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच  राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. चार दिवसापूर्वी तीन ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण लालू आत्राम,संजुबाई शंकर आत्राम, सौ.विमला बापू कुर्री यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश  केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज पुन्हा एक सदस्या  रिमा नागेश मडावी सदस्या  हिने प्रवेश केला  असुन एकूण राष्ट्रवादी पक्षाचे चार सदस्य  आविस मध्ये प्रवेश केला  आहे आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार  दिपक आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय  कंकडालवार यांच्या  नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्या चार सदस्यांनी आविस मध्ये  प्रवेश केला आहे .

जि.प.अध्यक्ष अजय  कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसम्पर्क कार्यालयात  प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला .जि.प.अध्यक्ष  अजय कंकडलवार यांच्या हस्ते नवीन प्रवेशित ग्रांप सदस्याचा  शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी जी.प.सदस्य संजयभाऊ चरुडूके,देवलमरी ग्राम पंचायतचे सदस्य हरीष गावडे,ग्राम पंचायत सदस्या  विद्या श्रीनिवास राऊत,माजी उपसरपंच जगनाथ मडावी,श्रीनिवास राऊत,राकेश कुर्री,किशोर कुर्री,संजय गोंडे, सुरेश पोरतेट, विनोद तोरेम,प्रशांत गोडशेलवार,प्रज्वल नागुलवार कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे, आदि उपस्थित होते.

हे देखील वाचा :

मी बीडचा डॉन .. पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत म्हणत गुंडाचा ठाण्यात धुडगूस संगणकाची तोडफोड

 

मन्नेवार समाजाच्या स्मशान भूमीतील शेडचे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

 

चातगाव येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

Comments are closed.