संविधान बदलले जाण्याची भिती दाखवून विरोधक करत आहेत मतदारांची दिशाभूल – खा.अशोक नेते
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक दि ८: भाजपा नेहमी विकासाचे राजकारण करते. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे ते महायुतीच्या सरकारविरूद्ध संविधान बदलण्याचा, आरक्षण संपविण्याचा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रातील मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास निवडणूक निरीक्षक म्हणून गेलेले भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खा. अशोक नेते यांनी भाजपा वसंतस्मृती कार्यालय, नाशिक येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकर वाघ, नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, महाराष्ट्र प्रदेश अनुसुचित जनजाती मोर्चा महामंत्री एन.डी.गावित, महाराष्ट्र प्रदेश अनुसुचित जनजाती मोर्चा कोषाध्यक्ष संदिप जाधव, महाराष्ट्र प्रदेश सदस्य लता राऊत, शहर सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, शहर उपाध्यक्ष पवन भगुरकर, प्रदेश अनुसूचित जाती जमाती मोर्चा माध्यम विभाग प्रमुख अक्षय उईके, ओ.बी.सी. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मोदी सरकारने १० वर्षात अनेक कल्याणकारी योजना आणून ऐतिहासिक निर्णय घेतले. हे सरकार सर्व समाजघटकांच्या सोबत आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम करत आहे. देशाच्या सर्वोच अशा राष्ट्रपतीपदावर मुस्लिम समाजातून डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम, दलित समाजातून रामनाथ कोविंद, आदिवासी समाजातून द्रोपदी मुर्मू यांना विराजमान करण्याचे काम भाजपच्याच नेतृत्वातील सरकारने केले आहे.
देशात जे काँग्रेस सरकारला कित्येक वर्षात जमले नाही ते भाजप सरकारने करून दाखविले. एवढेच नाही तर काश्मीर मधील कलम 370 हटवणे, तीन तलाक, राम मंदिर,ओबिसी समाज आयोगाला घटनात्मक दर्जाचे अधिकार, महिलांना 33% टक्के आरक्षण संसदेत बिल पास करण्याचे अधिकार, जनजाती गौरव दिन घोषित, संविधान दिन करणे असो, की इंदु मिलच्या जागी डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनविण्याची संकल्पना असो, हे सर्व देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी च्या भाजपच्याच नेतृत्वातील सरकारने केले आहे.
महाविकास आघाडीतील विरोधक नेते मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी संविधान, आरक्षण बचाव. यासारखा खोटा प्रचार करीत असल्याचे खा.नेते म्हणाले.
२०१४ पासून एनडीए सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्याचा वापर या सरकारने देशाला मजबूत करण्यासाठीच केला आहे. भाजप कधीही संविधान किंवा आरक्षणाला धोका पोहोचवणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा.
मोदींच्या नेतृत्वाखाली आणणार शिवशाही आणि रामराज्य – नितीन गडकरी
बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं
Comments are closed.