Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विश्वजित कदमांची थोरातांकडून मनधरणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. ७ सप्टेंबर : एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेत ‘ भारत जोडो’ यात्रा सुरू केलेली असतांनाच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेतृत्व आमदार विश्वजित कदम हे भाजपवाशी होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. एक महत्वाचा शिलेदार काँग्रेस मधून जाऊ नये म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट सांगलीत जाऊन विश्वजित कदम यांची मनधरणी सुरू केली.

काँग्रेस पक्षासाठी हा अडचणीचा काळ आहे. पण अडचणीचा काळ येता असतो आणि जात असतो.या अडचणीच्या काळातच तावून-सुलाखून नेतृत्व तयार होत असते, असे सूचक उद्गार बाळासाहेब थोरात यांनी विश्वजित कदम यांची भेट घेऊन जेष्ठत्वाचा सल्ला दिला. या भेटीत थोरात यांनी विश्वजित कदम याचे कौतुक करत पक्षातच राहण्यात हित आहे हे समजावून सांगितले.
आता यापुढे विश्वजित कदम काय निर्णय घेतात हे पुढील काळात समजेलच.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

थेट सरपंचपदांसह 1166 ग्रामपंचायतींसाठी राज्यात 13 ऑक्टोबरला मतदान

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा केला निर्घृण खून..!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.