Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘आप’ च्या कार्यालयावर हल्ला … वांद्रे पूर्व येथील घटना !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 19 ऑक्टोबर :-  वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर काल रात्री काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा – मेमन यांनी आरोप केला आहे.

आपच्या कार्यालयावर हल्ला झाल्यावर काहीकाळ वांद्रे परिसरात वातावरण तंग झाले होते . या प्रकरणी कार्यालयाच्या काही भागाचे नुकसान झाले असून पक्षाचा एकही कार्यकर्ता दुखावला नाही. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तात्काळ गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आम आदमी पार्टी मुंबईत ताकदीने वाढत असून महाराष्ट्रासह मुंबईत सर्वत्र पाठिंबा वाढताना दिसत आहे. आगामी महानगरपालिकेत निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या मुंबई महानगर पालिकेत आप चा झेंडा फडकवला जाणार आहे. काँग्रेस आणि भाजपाला आप च यश पचवता आले नाही म्हणून कार्यालय फोडण्याची हिम्मत केली असून हे अत्यंत दुदैवी आहे, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.

भाजपाच्या पदरात समाजकंटकांचा भरणा आहे. काँग्रेस पक्ष संपला. त्यांच्यातील भ्रष्ट भाजपामध्ये सामील झाले आहेत असून जी चांगली लोक उरलीआहेत ती आम आदमी पक्षात सामील होत आहेत. आपल्या पदरात पडलेल्या गैरव्यवहारांवरही अंकुश ठेवण्याइतपत नेतृत्व काँग्रेसमध्ये उरलेले नाही. पोलिसांनी या गुंडगिरीची तात्काळ दखल घ्यावी असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

ब्रह्मपुरी तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करा 

उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबियांची ईडी मार्फत चौकशी व्हावी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.