Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड सुरूच !

वनाधिकाऱ्यांचे अक्ष्यम दुर्लक्ष, सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार न्यायालयात मागणार दाद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 19 ऑक्टोबर :-  सिरोंचा वनविभागात अवैध मौल्यवान झाडांची अवैध व तस्करी मध्ये वनकर्मचार्यांचे वनतस्करांसोबत संबंध असल्याचे चौकशीत दोषी आढळल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू तसेच वनपाल व वनरक्षक यांना निलंबित करण्यात आले असल्याचे प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा सिरोंचा वनविभागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्यमंत्री व वनमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

याशिवाय सिरोंचा वनविभागातील आठही वनपरिक्षेत्रातील बिटांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असून न्यायव्यवस्थेमार्फत दाद मागणार आहेत. सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या आठ वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत जंगल परिसरात मागील काही महिन्यांच्या कालावधित वनजमिनीवर अतिक्रमण, सागवान झाडासह हजारो मौल्यवान झाडांची कत्तल करून तस्करी सुरूच आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात उत्तम दर्जाच्या सागवानसह मोठ्या प्रमाणात मौल्यवान वनसंपत्ती आहे. प्रथम दर्जाच्या सागवानाची वनविभागाद्वारे कायदेशीर कटाई करून राज्यात, देशात तसेच देशाबाहेर ही विक्री केली जाते. यातुन शासनाला कोट्यावधीचा महसुल ही प्राप्त होतो. तसेच या जंगलातून वनौषधी पासून विविध प्रकारच्या औषधही तयार केल्या जातात.त्यामुळे जिल्ह्यातील वनसंपत्तीचे देशात मोठे महत्व आहे.

जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या आठ वनपरिक्षेत्राचा कारभार स्थानिक वनपरिक्षेत्राधिकार्यांच्या अधिनस्त आहे. या भागात सागवानसह अनेक मौल्यवान वृक्ष आहेत. मात्र, संबंधित आठ ही वनपरिक्षेत्रातील संबंधित अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्यावरून कारभार चालवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जंगलातील गस्तीवर ही याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. परिणामत: संबंधित आठ ही वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणसह वृक्षतोड, अवैध तस्करी जोरात सुरू आहे. मात्र, संबंधित वनाधिकारी व कर्मचार्यांवर वरिष्ठ स्तरावरून प्रशासकीय कार्यवाही करण्यात उदासिनता पहावयास मिळत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे सिरोंचा वनविभागातील आठ ही वनपरिक्षेत्रात शंभर टक्के बिट चौकशी करून बेजबाबदार अधिकारी व कर्मचार्यांवर कार्यवाही करावी यासाठी निवेदन दिले होते. मात्र चौकशी होत नसल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे निवेदनात  संतोष ताटीकोंडावार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 सिरोंचा उवनसंरक्षक यांना यासंबंधी चौकशी करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांच्या कडून प्राप्त अहवालानंतरच कार्यवाही करण्यात येईल.

डॉ. किशोर मानकर, मुख्यवनसंरक्षक

 वनवृत्त गडचिरोली,

————————————————————-

 

सिरोंचा वन विभागामध्ये आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर  निलंबित करण्याची कार्यवाई करण्यात आली असून पुढे ही कोणती तक्रार आल्यावर सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

पुनम पाटे, उपवनसंरक्षक, सिरोंचा 

हे पण वाचा :-

ब्रह्मपुरी तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करा 

Comments are closed.