Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘हरिओम’ वरून वाद ! समाजवादी पार्टीचा आक्षेप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

मुंबई, 21 ऑक्टोबर :-   चित्रपट किंवा नाटक म्हटले की काही ना काही वाद हा निर्माण होतोच. मग ते एखादया दृश्यावरून असेल, किंवा एखाद्या संवादावरून असेल. पुर्वी सुद्धा असे अनेक वाद निर्माण झाले आणि शमले . तसाच एक वाद हरिओम चित्रपटातील संवादावरून सुरू झाला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हरिओम’ या मराठी चित्रपटावरून सध्या नवा वाद सुरू झाला आहे. चित्रपटातील एका संवादावर समाजवादी पार्टीने आक्षेप घेतला आहे. हा संवाद एका विशिष्ट समुदायाबद्दल बोलला गेला असल्याचं सांगत चित्रपटातील या संवादाला विरोध करण्यात येतोय. चित्रपटातील संवादात भैय्या महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीकडून हा संवाद चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करण्यात येतेय. अन्यथा चित्रपटगृहाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही समाजवादी पार्टीकडून देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात काही अशी दृश्य आणि संवाद आहेत ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाच्या एका संवादावरून समाजवादी पार्टीने संताप व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टीचे कांदिवली चारकोप विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अझहर सिद्दीकी या संवादावर संतापले आहेत. त्यांनी थेट कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन निर्मात्यांनी हे संवाद चित्रपटातून काढून टाकावेतअशी मागणी केली आहे. चित्रपटात मुख्य नायकाच्या तोंडी असलेल्या संवादामुळे हा वाद निर्माण झाला आहे. ‘पुरुषोत्तम भैय्या, हा माझा महाराष्ट्र आहे. जर मराठी माणसांची सटकली तर महाराष्ट्राच्या नकाशावरून तुला आणि तुझ्या भावाला गायब करू’, असा संवाद ‘हरिओम’ चित्रपटात आहे.

आता सिद्दीकी यांनी यावर आक्षेप घेत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटातील उत्तर भारतीयांबद्दलचे चुकीचे शब्द काढून टाकावेत व निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसं न झाल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.