Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

75 टक्के व्टिटर कर्मचार्यांची नोकरी धोक्यात

एलाॅन मस्क यांची व्टिटर डील शेवटच्या टप्प्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 21 ऑक्टोबर :-  जगातील श्रीमंत व्यक्ती एलाॅन मस्क यांची व्टिटर डील शेवटच्या टप्प्यात असल्याच म्हटल जात आहे. वादग्रस्त ठरलेली व्टिटर डील लवकरच पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एलाॅन मस्क यांनी व्टिटर खरेदी केल्यानंतर अनेक व्टिटर कर्मचार्यांची नोकरी धोक्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. व्टिटर ची मालकी मिळाल्यानंतर मस्क 75 टक्के कर्मचार्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे. शिवाय या चर्चेमुळे व्टिटर कंपनीमध्ये हालचालींना वेग आल्याचे म्हणटले जात आहे. दरम्यान, व्टिटर कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले आहे कि, व्टिटर कंपनीची कर्मचार्यांना कमी करण्याची कोणतीही योजना नाही.

एप्रिलमध्ये करार केल्यानंतर मस्क यांनी घेतली होती माघार

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एलाॅन मस्क यांची व्टिटर डील मागील काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. बहुचर्चित व्टिटर डील लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे तसेच स्पेसएक्सचे मालक एलाॅन मस्क यांनी एप्रिल महिन्यामध्ये व्टिटर खरेदी करण्याची योजना आखली. त्यानंतर माहिती लपवल्याचा आणि बनावट खात्यांसंबंधी योग्य माहिती न दिल्याचा आरोप करत मस्क यांनी व्टिटर खरीदी करण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा ही डील पूर्ण होण्याची शक्यता आहे. मिडीया रिपोर्ट नुसार, एलाॅन मस्क व्टिटर खरेदी करू शकतात. इतकेच नाही तर मस्क सुरूवातीला ठरलेल्या कराराच्या किंमतीत म्हणजेच 54.20 डाॅलर प्रति शेअर किमतीचे 44 अब्ज डाॅलरमध्ये व्टिटर खरेदी करणार आहे.

एलाॅन मस्क व्टिटर डीलसाठी उत्साहित

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एलाॅन मस्क यांनी 20 ऑक्टोबर रोजी प्रतिक्रिया देत म्हटले कि, मी व्टिटर डीलसाठी खुप उत्सूक आहे. मात्र, या सोशल मिडीया कंपनीसाठी कंपनीच्या मुळ किंमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. मस्क यांनी आता प्रति शेअर 54.20 डाॅलरमध्ये व्टिटर विकत घेण्याची ऑफर दिली आहे. सुरूवातीला मस्क यांचा व्टिटर करार याच किंमतीत ठरला होता. मात्र, त्यानंतर बनावट खात्यांची माहिती लपवल्याने व्टिटर कंपनी कमी किंमतीत खरेदी करण्याची ऑफर मस्क यांनी दिली होती. त्यानंतर मस्कयांनी व्टिटर डील मोडली होती आणि आता पुन्हा मस्क व्टिटर खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

व्टिटर कर्मचार्यांची चिंता वाढली

व्टिटर कर्मचार्यांना काढून टाकण्याची मस्क यांची योजना समोर आल्यानंतर व्टिटर कर्मचार्यांची चिंता वाढली आहे. व्टिटर डीलबाबत मस्क यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. या कायदेशीर लढाईतून सुटका म्हणून मस्क यांनी माघार घेत पुन्हा व्टिटर ला करारासाठी नवं प्रत्र पाठवले आहे. यावर व्टिटर कंपनीवर पुढील बाबी अवलंबून आहेत.

हे पण वाचा :-

सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी पुन्हा बहाल

कोरोनाचा कमबॅक : ओमिक्राॅनच्या BF.7 मुळे वाढली चिंता

Comments are closed.