Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य मंत्रीमंडळाचा जुलै महिन्यामध्ये विस्तार करु- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, 30 जून – राज्यातले अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा त्या संदर्भात बैठकही असतात. त्यासाठी केंद्रात जावं लागतं. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे. मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच जुलै महिन्यामध्येचं आम्ही विस्तार करू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते यावेळी ते विमानतळावर आले असता त्यांनी माध्यमांची संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत.

राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते त्याचा पाठपुरावा करावा लागतो या संदर्भातच अनेक बैठक असतात त्यामुळे केंद्र जावं लागतं असं फडणवीस म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.