Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आकाशवाणी केंद्रावर थेट मुलाखतीकरिता ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमा अंतर्गत कु. हर्षदा गोंगले विद्यार्थिनीची निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २७ जुलै : विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागात १ मे २०२० रोजी सुरु झालेल्या ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमांतर्गत मुलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडपल्ली चेक येथील हर्षदा चंद्रपाल गोंगले इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीची नागपूर आकाशवाणीवर मुलाखतीकरिता निवड झाली असून मंगळवार, गुरुवार, शनिवारला सकाळी १०.३५ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

‘शाळेबाहेरची शाळा’ भाग १७६ हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरीता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहोचविणे अपेक्षित असल्याने सदर उपक्रमासाठी मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चेक येथील पालक चंद्रपाल कारुजी गोंगले यांची मुलगी हर्षदा चंद्रपाल गोंगले इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी असून या विद्यार्थीनींची झाडांची पाने हिरवी का दिसतात? त्यात कोणते द्रव्य असते या विषयावर सकाळी १०.३५ वाजता मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला आकाशवाणीच्या नागपूर ‘अ’  (५१२.८)  केंद्रावरून थेट मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर उपक्रमासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडपल्ली चेक चे मुख्याधापक ज्ञानेश्वर नारायण खंगार, शिक्षिका माधुरी पोतराजे, रत्नमाला राचेर्लावर, शिक्षक अजय आलुलवार, विनोद तंगडपल्लीवर,  यामाजी सातपुते यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सी.आर.पी.एफ देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा, हा आज अभिमानाचा क्षण आहे:कमांडंट मोहनदास खोब्रागडे

वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्या मलाईदार पोस्टिंगसाठी मंत्रालयात लॉबिंग; वनराज्यमंत्राच्या शिफारस पत्रांचा सीएमओत खच!

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची गरज : राजु झोडे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.