Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!

ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून केले ठिय्या आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ जुलै : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आलापल्ली ची ओळख आहे. या ग्रामपंचायतीत ६ महिन्या अगोदर सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका झाल्या असून या ठिकाणी मोठ्या अटीतटीवर सरपंच आणि उपसरपंचाची निवड करण्यात आली.

या निवडणुकीत पहिल्यांदाच नवनियुक्त युवक सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले शंकर मेश्राम पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरपंचपदी विराजमान झाले. शहराचा विकास होईल. नवीन संकल्पना, नवीन उमंग आलापल्ली शहराच्या विकासकामात पदरी पडेल अशी अपेक्षा  असतांना सद्श्याने अचानक एल्गार पुकारल्याने चर्चेचा विषय निर्माण झाला आहे . ग्रामस्थासह ग्राम पंचायत सदस्यानी  स्वतः सरपंच आणि प्रशासनाच्या विरोधात वेळोवेळी तोंडी निवेदन देऊनही ऐकत नसल्याने चक्क ग्रामपंचायत सदस्याने आज ग्रामपंचायतला कुलूप ठोकून ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलनला बसून बंड पुकारल्याने शहरात वाऱ्यासारखी माहिती होताच खळबळ माजली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवनियुक्त सरपंच शंकर मेश्राम हे शहरातील विकासकामांना प्राधान्य देत नाहीत. एव्हढेच नाहीतर ग्राम सदस्यांनी तसेच ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दैनदिन कामगार स्वच्छक यांचा वेतन अदा करण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप खुद्द ग्रा.पं. सदस्य स्वप्नील श्रीरामवार यांनी केल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजल्याने निकटवर्तीय राजकीय पुढाऱ्याने समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ग्रामसदस्य विकासकामाचा मुद्दा निर्माण केल्याने नागरिक सोबत असल्याने मोठे राजकीय नेते स्वप्नील श्रीरामवार यांच्याप्रती चिंता व्यक्त केली आहे.

आलापल्ली ग्रामपंचायत मध्ये नावलौकिक करण्यासाठी तसेच पक्षाचे राजकीय नाव टिकविण्यासाठी सामाजिक आर्थिक स्थिती पणाला लावून राजकीय हस्तक्षेप नाव टिकविण्यासाठी अटीतटीची राजकीय लढाई समोर उदयास येत असली तरी या ठिकाणी विकास कामाला मुद्दा निर्माण केल्याने ग्रामपंचायत पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्वप्नील श्रीरामवार यांनी चार-ते पाच महिन्यापासून नाली सफाईच्या मजुरांची मजुरी थकली असल्याने वारंवार मजुरीची मागणी करूनही मिळाली नसल्याने त्रासून शेवटी ग्रामपंचायत ला कुलूप लावण्याची नामुष्की आल्यामुळे शेवटी ठिय्या आंदोलन पुकारावे लागले. त्यामुळे विरोधकाला आयते कोलीतच सापडल्याने चर्चेचा मोठा विषय निर्माण झाला आहे.

सदर आंदोलनाची माहिती होताच अहेरीचे विस्तार अधिकारी रायपुरे यांनी आलापल्ली गाठून सरपंच, ग्रामसचिव आणि ग्रां.प. सदस्यासोबत चर्चा करून तात्पुरता तोडगा काढला असला तरी विकासकामाचे विषय जैसे थे होते .त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातहि  काही वेळ काम बंद झाले असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली असून आलापल्ली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शेवटी चर्चेअंती ग्रामविस्तार अधिकारी रायपुरे  यांनी काम केलेल्यांचे पैसे व दैनंदिन काम करणाऱ्या नाली उपसा करणाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर जमा करण्यात येईल अशी ग्वाही दिल्यानंतर स्वप्निल श्रीरामवार यांनी आपला आंदोलन मागे घेतले असले तरी तोडगा लवकरात लवकर न काढल्यास पुन्हा आंदोलन पुकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विषय, विकासकाम, ग्रामपंचायतची उदासीनता चव्हाटयावर आल्याने आतातरी विकासाची कास नित्यनियमाने समोर नेऊन आलापल्लीचे नाव आदर्श ग्राम म्हणून समोर येऊन गावाचा विकास होईल का? अशी जनमानसात चर्चा निर्माण झाली असून वेळीच दक्ष राहण्याची गरज सरपंच यांना असल्याचे बोलले जात असून राजकीय वर्तुळात खमंग  चर्चेला उधान आले आहे .

 

हे देखील वाचा  :

आकाशवाणी केंद्रावर थेट मुलाखतीकरिता ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमा अंतर्गत कु. हर्षदा गोंगले विद्यार्थिनीची निवड

सी.आर.पी.एफ देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा, हा आज अभिमानाचा क्षण आहे:कमांडंट मोहनदास खोब्रागडे

वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्या मलाईदार पोस्टिंगसाठी मंत्रालयात लॉबिंग; वनराज्यमंत्राच्या शिफारस पत्रांचा सीएमओत खच!

 

 

Comments are closed.