Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश

पोलीस अधीक्षक यांचे हस्ते मोबाईल धारकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आज दिनांक १७/०६/२०२१ रोजी सायबर पोलीस ठाणे गडचिरोली येथे शोध घेतलेले मोबाईल, मोबाईल धारकांना परत करण्याचा कार्यक्रम,  पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली समीर शेख यांचे उपस्थितीत पार पडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हरविलेल्या ३२ मोबाईलचे वाटप करण्यात आले. सायबर पोलीस ठाणे गडचिरोली यांचेकडे सहा महिण्यात मोबाईल हरविल्याचे १५० तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे गडचिरोलीच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी ९० मोबाईलचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.

कॉलेजच्या तरुण-तरुणींपासुन तर गृहीणींपर्यंत मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  याचाच फायदा घेत भुरटे चोर अॅन्ड्राईड मोबाईल धारकांचा पाठलाग करुन गर्दीचे ठिकाण, आठवडी बाजार, यात्रा, अशा ठिकाणांवरुन चोऱ्या करतात. तसेच धकाधकीच्या जीवनामुळे व विसरभोळेपणामुळे मोबाईलधारक कुठेही आपले मोबाईल विसरून जातात. मग असे मोबाईल मिळणे आव्हानात्मक असते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशा वेळी नागरिकांच्या मदतीसाठी सायबर पोलीस ठाण्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही. गडचिरोली सायबर पोलीस स्टेशन मोबाईलचा शोध लावण्यासाठी अथक परीश्रम घेत असुन मिळालेले मोबाईल, मोबाईल धारकांना परत करत असतात.

सायबर पोलीस ठाणे यांचे कामगिरीचे अंकित गोयल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक गडचिरोली, यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर जिल्हाभरातील नागरिकांना आवाहन केले आहे कि, सायबर गुन्हयाविषयी तसेच मोबाईल चोरी,  मोबाईल गहाळ होण्याबद्दल जर आपल्या काही तक्रारी असतील तर आपण त्या सायबर पोलीस ठाणे येथे नोंदवाव्यात.

हे देखील वाचा :

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 57 कोरोनामुक्त, 26 नवीन कोरोना बाधित

नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.