Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपालांनी केले उद्घाटन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

मुंबई डेस्क, दि. 17 जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१७) सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यपालांनी आयुक्त नगराळे यांचेसोबत कॅन्टीन स्टोअरला भेट देऊन विविध उत्पादनांची तसेच गृहोपयोगी वस्तूंची माहिती घेतली. हे कॅन्टीन स्टोअर्स पूर्णपणे रोखविरहित असेल. ग्राहकांना केवळ कार्डद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल भरता येईल.

राजभवन येथील पोलीस कॅन्टीनमधून महाराष्ट्र पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे राजभवन व जवळपासच्या परिसरात कर्तव्य बजावित असलेले जवान तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना अन्नधान्य, किराणा सामान, इलेक्ट्रोनिक वस्तू तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राजभवन परिसरात सुरु करण्यात आलेले पोलीस कॅन्टीन मुंबईतील सहावे पोलीस कॅन्टीन आहे.

मुंबई पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या हस्ते दिनांक २६ जानेवारी २०१२ रोजी करण्यात आले होते. सध्या नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव व कोळे कल्याण या ठिकाणी कॅन्टीनच्या शाखा आहेत.

हे देखील वाचा : 

७९ व्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांचेकडून राज्यपालांना शुभेच्छा

नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक

 

 

Comments are closed.