Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर गणेशोत्सव मंडळांना परवाणगी आवश्यक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 27ऑगस्ट  : कोविड -19 साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित झाल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तालुक्यांचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहणार आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असणार आहे. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे, मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.  जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती  साध्या स्वरुपात  प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक/गर्दीचे कार्यक्रमांऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे उदा. रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतरही निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. जमावबंदी / कलम 144 अंतर्गत आदेशाचे तंतोतंत पालन करावे. गणपती  मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरीक अंतराचे ( फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे निमिय ( मास्क सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  व्यक्तींमध्ये भौतीक दृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.  श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत असे परिपत्रकात नमूद आहे.

 

हे देखील वाचा:

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी, संजय मीणा

भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय रजेवर राहून पुकारला एल्गार

Comments are closed.