Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय रजेवर राहून पुकारला एल्गार

भामरागड वनविभागात उपवनसंरक्षक म्हणून आशिष पांडे रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांसोबत उद्धट वागतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाकडे वनकर्मचार्यानी संबंधित उपवनसंरक्षकाची तक्रार करून हि कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागण्याची समज दिली होती तरी हि कुठलाच बदल झाला नसल्याने कर्मचाऱ्यांचा समज देण्याचा प्रयत्न असफल झाला शेवटी त्रासून उपवनसंरक्षक यांच्या मनमानी कारभारा विरोधात एल्गार पुकारुन नवीन उपवनसंरक्षक देण्याची मागणी केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 ओमप्रकाश चुनारकर,

अमरावतीतील मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असताना हि  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी जाचाला आणि दबावात आणल्याने शेवटी निष्ठावान असलेल्या दिपाली चव्हाण यांना आत्महत्या करावी लागली आहे . त्यावेळी ऑडियो आणि लेखी पत्र सापडल्याने वन विभागात एकच खळबळ उडाल्याने वरिष्ठांची कनिष्ठ अधिकार्याप्रती असलेली प्रतिमा समोर आली .त्या प्रकरणाचा सखोल  चौकशीत दोषी आढळल्याने शेवटी दोषी ठरवून काही वनाधिकाऱ्यांना तुरुंगाचा चार भिंतीच्या आत राहून कारावासही भोगावा लागला होता . हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा भामरागड वनविभागामध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या उपवनसंरक्षक आशिष पांडे यांनी दबाव तंत्र वापरणे म्हणजे आपल्या पदाचा दुरुपयोग करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत तर नाही ना? यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी कर्मचार्यात दह्शत निर्माण झाली आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कशी चौकशी करून न्याय मिळवून देतात हे पाहणे औचित्त्याचे ठरेल …..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि,२६ ऑगस्ट : गडचिरोली वनवृत्त कार्यक्षेत्रात येत  असलेल्या भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरी, मनमानी कारभारा विरोधात वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आज आलापल्ली येथील वनसंपदा कार्यालयात एक दिवसीय रजेवर राहून एल्गार पुकारुन या प्रकरणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक पांडे यांच्याविरुद्ध प्रधान सचिव वने,मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.

 उपवनसंरक्षक आशीष पांडे हे भामरागड वनविभागात रुजू झाल्यापासून वन कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सदैव देत असल्याने वादग्रस्त ठरले आहेत.कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच महिला कर्मचाऱ्यांना वारंवार उद्धटपणे बोलत असतात. कुठलेही कारण नसतानाही कारणे दाखवा नोटीस काढतात .त्यामुळे या विभागातील महिला कर्मचारी लेखापाल जयश्री नालमवार यांनी पांडे यांच्या जाचाला कंटाळून भयभीत होवून ३१ जुलैला सेवानिवृत्ती स्विकारली आहेत. याशिवाय कर्मचाऱ्याला दबावात आणून जाणीपूर्वक अपमानास्पद वागणूक देत असतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भामरागड वनविभागाअंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन न करता विभागीय कार्यालयात अनुदान उपलब्ध असतानाहि  जाणीवपूर्वक दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटल्यावर ही विविध कारण दाखवून अनुदान थांबवून ठेवतात. त्यामुळे परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन ते तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे . याशिवाय विहित मुदतीत वेतन मिळत नसल्याने वेतनातून कपात होणारे जीवन बिमा, सोसायटी , व इतर कर्ज विहित मुदतीत फायदा होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे..

भामरागड वनविभागामध्ये यापूर्वी कर्तव्यावर असलेले उपवनसंरक्षक रज्जत कुमार हे देखील वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली धुळे याठिकाणी झाली आणि धुळे येथील आशीष पांडे हे भामरागड वनविभागात रुजू झाले. मात्र सदर हे दोनही वादग्रस्त वनाधिकारी असून या आधी धुळे येथे आशिष पांडे यांनी एका  वन कर्मचाऱ्याला मारल्याची तक्रार असून असभ्य वागणुकीमुळे भामरागड येथे बदली करण्यात आली आहे . मात्र पांडे याची वनविभागात ही असभ्य वागणूक ,उर्मटपणा, मनमानी कारभारामुळे वनकर्मचार्यात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे एका महिला लेखापालाने सेवानिवृत्ती स्विकारली आहे तर काहीजण मेडिकलवर राहून सेवा उपभोगत आहेत. त्यामुळे वेळीच दखल घेवून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे वनाचे रक्षण, आणि विभागीय कार्यालयातील वातावरण निर्मळ राहण्यास मदत होईल.

भामरागड वनविभागात उपवनसंरक्षक म्हणून आशीष पांडे रुजू झाल्यापासून वनकर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणें,मनमानी कारभार करणे, याविषयी माझ्याकडे वेळोवेळी वन कर्मचार्यांनी तक्रारी दिल्या असून अशा वादग्रस्त अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर इतरत्र स्थानांतर करावे अन्यथा मोठे आंदोलनही उभे राहू शकणार याची वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची नित्यांत गरज आहे..

आमदार,राजे धर्मरावबाबा आत्राम विधानसभा क्षेत्र अहेरी

भामरागड विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी असभ्य, अपमानास्पद वागणूक देत असल्याची लेखी तक्रार प्राप्त झाली असून त्याची सखोल चौकशीसाठी समिती गठीत करून त्यासबंधी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल.तपासाअंती दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई ची दखल घेतली जाईल.

डॉ.किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त गडचिरोली,

हे देखील वाचा,

काबुल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला

जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांना नाही

प्रलंबित वन हक्क दावे निकाली काढा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरीचे उपविभागीय दंडाधिकाऱ्या सोबत चर्चा

Comments are closed.