Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काबुल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था २६ ऑगस्ट: काबूल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जेव्हा हा आत्मघाती हल्ला झाला तेव्हा विमानतळावर हजारो लोक उपस्थित होते. काबूल विमानतळाबाहेर हा हल्ला झाल्याचे अमेरिकेचे सार्वजनिक संरक्षण विभागाचे सहाय्यक सचिव जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. मृतांची अद्याप पुष्टी झालेली नाही.

हा आत्मघाती हल्ला  कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने या हल्ल्याबाबत इशरा दिला होता. ब्रिटनचे संरक्षण सचिव जेम्स हिप्पी म्हणाले होते की हा एक धोका आहे ज्याचे तपशील मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण हा धोका अगदी जवळ असून अत्यंत घातक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा हल्ला इसिसकडून केला जाऊ शकतो. यापूर्वी तालिबानने पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला होता. तेव्हापासून हजारो लोकांनी अफगाणिस्तान सोडले आहे. तालिबानच्या राजवटीच्या भीतीने लोकांना 31 ऑगस्टपूर्वी अफगाणिस्तान सोडायचे आहे.

Comments are closed.