Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन..त्याच तिकीट मशीनचा एसटीत वाहका हातात झाला स्फोट ..आऊट डेटेट तिकीट मशीनच ठरली बॉम्ब

राज्यातील एस.टी चे वाहक हातात घेवून फिरतात जिवंत बाँम्ब. एसटीच उठली लोकांचा जीवावर.एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट झाल्याची महाराष्ट्रातील पहीलीच घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया दि,२७ ऑगस्ट : गोंदियात प्रवाश्यांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करीत असताना तिकीट मशिनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक गंभीर जखमी  झाल्याची घटना गोंदियाच्या मुख्य बसस्थानक परिसरात घडली आहे. चालक लीलाधर मडावी( रा. अहेरी )आणि वाहक कल्पना मेश्राम 36 (रा. अहेरी ) हे दोघेही अहेरी येथून बस क्रमांक M H 40 AQ 6320 घेऊन गोंदियात आले होते .स्पोट झाल्याने बस  वाहकाचा केवळ पंजा भाजला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र त्या महिला वाहकाचे हात निकामी झाला आहे.. आधी केटीसी रुग्णालयात  प्राथमिक उपचार  करून  या प्रकरणी  रामनगर पोलिस ठाण्यात सदर महिला वाहकाने तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे एसटीच्या वाहकाजवळील ईटीएम मशिन जिवंत बाँम्ब ठरत असल्याचे सिद्ध झाले असून भविष्यात  मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मँन्युअल तिकिट पद्धत चलनात आणून इलेक्ट्राँनिक टिकीट मशीन बंद करण्याची मागणी समोर आली आहे.

एसटी बसने प्रवास करतेवेळी तिकीट इश्यू मशीनच्या माध्यमातून प्रवाश्यांना तिकीट पुरविली जात आहे. तर एका खासगी कंपनीकडून या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मात्र, अल्पावधीतच निकृष्ट दर्जाची बॅटरी, बटण काम न करणे, तिकिटांची रक्कम मशीनमध्ये दाखवणे मात्र तिकीट छपाई न होणे, चुकीचे तिकीट येणे अशा तक्रारी कर्मचाऱ्यांकडून येऊ लागल्या होत्या असे असले तरी महामंडळाकडून मशीन दुरुस्त करण्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांना दाद दिली जात नाही. त्यातच बुधवारी गोंदिया येथे घडलेल्या घटनेने मशीन सदोष असण्याला दुजोरा मिळाला आहे.

 

पुन्हा अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी वाहकांना पुरविण्यात आलेल्या जुन्या मशीन महामंडळाने जमा करून त्यांना नवीन मशीन उपलब्ध करून देण्यात यावे,  घटनेत जखमी झालेल्या महिला वाहक कल्पना मेश्राम यांना उपचार खर्च व आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा,

भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय रजेवर राहून पुकारला एल्गार

काबुल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला

जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांना नाही

Comments are closed.