Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी, संजय मीणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली  27ऑगस्ट : गडचिरोली जिल्हयात प्रत्येक तालुक्यात मोठया प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू असून नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. गडचिरोली जिल्हयात ६ डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेले आहेत. आजच्या घडीला देशात डेल्टा प्लसमुळे अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. याविरुध्द लढण्याकरिता लसीकरण हे केवळ एकच शस्त्र आपल्या हाती आहे. असल्याचे ते म्हणाले. जिल्हयात अंदाजित 7.90 लक्ष नागरिकांनी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत जिल्हयात 3,19,003 नागरिकांनी पहिला तर 81519 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याचे प्रमाण अनुक्रमे 40 व 10 टक्के आहे.

कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस विशेष लसीकरण मोहीम : शासकीय, निमशासकीय खाजगी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी आपले लसीकरण पुर्ण करुन घ्याणेबाबत आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांकरिता ज्यांचे दुसरे डोस पुर्ण व्हायचे आहे त्यांनी दि.28 आणि 30 ऑगस्ट रोजी आपले लसीकरण पुर्ण करुन घ्यावे याकरिता विशेष लसिकरण मोहिम ही तालुक्यात लावलेली आहे. सर्वांनी यास सहभागी होऊन लसीकरण पुर्ण करुन सुरक्षित व्हावे, तसेच आपले कुटुंब सुरक्षित करावे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्या डेल्टा प्लसग्रस्त कोरोना रुग्णांनी लस घेतली आहे, त्यांच्यात मृत्युचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाच्या सुरक्षिततेकरीता आपण लसीकरण करुन घ्यावे आणि दोन्हीही डोस विहित मुदतीत घ्यावे.

– शशिकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.