Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अम्रुत आहार योजनेतील स्वंयपाकीन महीलांना मानधन वाढीसंदर्भात मुख्यमंञ्यानी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी;वर्षाताई मोरे

डाँ एपीजे अब्दुल कलाम अंगणवाडी अम्रुत आहार योजनेतील गरोदर माताना स्वयंपाक शिजविणा-या महीलाचे मानधन दरमहा एक हजार रुपयावरुन सात हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
डाँ एपीजे अब्दुल कलाम अंगणवाडी अम्रुत आहार योजनेतील गरोदर माताना स्वयंपाक बनविणा-या महीलाचे मानधन दरमहा एक हजार रुपयावरुन सात हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावे.महीला संघटनेची अध्यक्ष गिताताई उईके, विजय खरवडे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंञी एकनाथजी शिन्दे यांना भेटुन मानधन वाढी संदर्भात सविस्तर चर्चा केली.

गडचिरोली दि,०२ :  कुरखेडा येथे डाँ एपीजे अब्दुल कलाम अम्रुत आहार योजनेतील अंगणवाडी गरोदर माता स्वंयपाकीन संघटनेच्या वतिने नुकतेच पार पडलेल्या कुरखेडा, वडसा,आरमोरी,धानोरा तालुक्यातील महीलांची मानधन वाढीसंदर्भात शेकडो महीलांच्या उपस्थीतीत सामुहीक विचारमंथन बैठक घेण्यात आली .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऩागपुर येथील हिवाळी अधिवेशनात बैठक आयोजित करून गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेञात काम करणा-या डाँ एपीजे अब्दुल कलाम अंगणवाडी अम्रुत आहार योजनेतील गरोदर माताना स्वयंपाक बनविणा-या महीलाचे मानधन दरमहा एक हजार रुपयावरुन सात हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावे .या करीता महीला संघटनेची अध्यक्ष गिताताई उईके भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंञी एकनाथजी शिन्दे यांना भेटुन मानधन वाढी संदर्भात सविस्तर चर्चा केली.व त्यांना निवेदन दिले व त्या नुसार दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढीचे निर्णय घेण्या संदर्भात मुख्यमञ्यानी आश्वासन दिले.ते सदर रास्त मागणी तात्काळ मंजुर करुन ती लागु करावी. या करीता शिवसेना शिन्दे गटाच्या विदर्भ महीला निरीक्षक वर्षाताई मोरे ,भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष यांचे उपस्थीतीत कुरखेडा येथील किसान मंगल कार्यालयात शेकडो महीलांची बैठक घेण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेञात काम करणा-या संपुर्ण पेसा क्षेञातील डाँ एपीजे अब्दुल कलाम अंगणवाडी अम्रुत आहार योजनेतील गरोदर माताचे स्वंयपाक करणा-या सर्व महीलाना मानधन वाढ करुन त्या प्रत्येक महीलांचे मानधन प्रत्येकीच्या बँक खाते पुस्तीकेत जमा करण्या संदर्भात बैठकीत निर्धार करण्यात आले असून मुख्यमंञ्याना कळविणार व ते लागु करवुन घेणार असल्याचे बैठकित  शिन्दे गटातील शिवसेनेच्या विदर्भ महीला निरीक्षक वर्षाताई मोरे,व भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगीतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अंगणवाडी अम्रुत आहार महीला योजनेतील महीला स्वयंपाकीन संघटनेच्या उपाध्यक्ष कल्पना गायकवाड,सचिव प्रियंका रामटेके,संगीता जाळे,विशेष मार्गदर्शक जेष्ट सामाजीक कार्यकर्ते योगाजी बनपुकर,नाणाजी काळबांधे दिवाकर चिलबुले,लोभाजी हर्षे,सुरेश रोहनकार,समाजसेवीका संगीता हर्षे,सविता सुतारे,तेजस्वीनी कुमरे,उषा धुर्वे,अर्चना बावणे,हिना नेवारे,रेखा जयेन्द्र,सोनु ठवरे,नमिता ताराम,संजुवेणी सय्याम,सुप्रीया पुराम,विमल ताराम,ममता नाकाडे,योगीता लाडे,उषा सहारे,गिता कवडो,शालु दडमल,मिना भोयर,नागुबाई प्रधान,अंजु गेडाम,वंदना राऊत,पुष्पा प्रधान,प्रिजम कुमेटी,पुस्तकला कुमरे,संध्या लोणबले,वर्षा गुरनुले,दुच्छला होटी,शामला काचंगे,वर्षा कोटपेच्चा,आश्वीनी गुरनुले,व्रुंदा नागोसे,वैशाली गेडाम,शिला कुमरे,शुभांगी लेनगुरे ,संगीता लेणगुरे,निरुताई मडावी या सह शेकडो महीला उपस्थीत होते.

या  कार्यक्रमात ईच्छुक महीलानी शिन्दे गटातील शिवशेनेत प्रवेश केला .त्यांना शिवबंध बाधुन पक्षाचे दुप्पटे देण्यात आले.व प्रत्येक वेळी महीला वरील होणारे अन्याय हाणुन पाडले जातील आम्हि सदैव महीलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे वर्षा मोरे म्हणाले,

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती साविञीबाई फुलेच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन व माल्यार्पन करुन करण्यात आले.प्रास्ताविक गिता उईके यानी केले.सुञसंचालन प्रयंका रामटेके यानी तर आभार कल्पना गायकवाड यांनी मानले.

Comments are closed.