Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विहीरगाव संघटनेचा पुढाकार – दारू विक्रेत्यांना दिली तंबी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 01 जानेवारी 2024 :- तालुक्यातील विहीरगाव येथे अवैध दारू विक्री सुरु असल्याने,  गावातील संघटनेने मुक्तिपथच्या मदतीने सक्रीय होऊन विहीरगाव येथील अवैध दारू विक्रेत्यांना दारूविक्री न करण्याची तंबी दिली. अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास कारवाई केली जाईल अशी सूचना देण्यात आली.

शेजारच्या गावात दारूविक्री बंदी असल्याने त्या गावातील व्यसनी लोकं पिण्यासाठी विहीरगाव येथे दारू पिण्यासाठी गर्दी करतात. यामुळे गावातील वातावरण बिघडत असल्याने आपल्या गावात सुद्धा दारू विक्री बंदी असलीच पाहिजे असा निर्णय गावसंघटनेणे घेतला. यासाठी दिंनाक 20 डिसेंबर रोजी गावात सभा घेऊन आवश्यक चर्चा करून व सर्वसहमतीने दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विहीरगाव संघटनेने हे सक्रीय पाउल उचलले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावात दारू पिण्यासाठी लोकं येत असल्याने, शाळकरी, तरून मुले बिघडतील, महिलांना त्रास होतो, गावातील वातावरण बिघडते, गावातील लोकंही अधिक प्रमाणात दारू प्यायला लागतील, भांडणे वाढतील, हा विचार करून गाव संघटनेने हा निर्णय घेतला. सूचना दिल्या नंतर सुद्धा पुढे चालून दारू विक्री आढळ्यास संघटनेद्वार कायदेशीर पद्धतीने दारू नष्ट करणे,  ग्रामपंचायत द्वारा दंडात्मक व पोलीस कारवाई करणे, इत्यादी सूचना विक्रेत्यांना यावेळी देण्यात आल्या. यावेळी पोलिस पाटील रवींद्र करपते, मोरेश्वर करपते ,किशोर भोयर, शांताराम देशमुख, अरुण रोहनकर व इतर दारू बंदीचे संघटनेचे सदस्य, मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

 

 

Comments are closed.