Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रानटी हत्तींचा हैदोस…महिलेचा घेतला बळी…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 30 डिसेंबर  : गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौशल्या राधकांत मंडल (६७ रा. शंकरनगर) असे या मृत महिलेचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी परतलेल्या रानटी हत्तींनी पुन्हा हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्या मुळे वन विभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकुळ घालून पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यावेळी प्रसंगावधान दाखवल्याने गावकरी थोडक्यात बचावले होते. परंतु या घटनेने वन विभागाने कोणताही धडा न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.