Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उप पोस्टे दामरंचा येथे भव्य जनजागरण मेळावा; गरजुंना साहित्यांचे वाटप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

दामरंचा :  उप पोलीस स्टेशन दामरंचा येथे   दि. २० डिसेंबर २०२३ रोजी पोलीस अधिक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता अपर पोलीस यतीश देशमुख. अपर पोलीस अधिक्षक एम.रमेश यांच्या संकल्पनेतून तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसगर यांच्या मार्गदर्शनाखाली व सीआरपीएफ “जी” कंपनी ९ बटालियन यांच्या सहकार्याने उप पोस्टे दामरंचा येथे भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला .

या कार्यक्रमाचे उद्घाटन मौजा- मांड्रा गावचे सरपंच विलास मडावी यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना उप पोस्टे दामरंचाचे तत्कालीन प्रभारी अधिकारी महाजन मैसनवाड यांनी कर्यक्रमाची प्रस्तावना करून उपस्थित गावकऱ्याना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच सीआरपीएफ जी कंपनी 09 बटालियनचे ए.सी. मो.शकील यांनी उपस्थित नागरीकांना शासनाच्या विविध योजना बाबत माहिती देवुन पोलीस यंत्रणा हि तुमच्या विकासासाठी कर्यरत असुन कोणीही नक्षलवाद्यांच्या भुल-थापांना बळी न पडता पोलीसांना सहकार्य करण्याचे आव्हान केले.

सदर मेळाव्यात दामरंचा ग्रामपंचायत मांड्रा चे सरपंच विलास मडावी ,पोउपनि/ बावनथडे,पोउपनि/अहिरे, सीआरपीएफ चे ए.सी.मो.शकील, सीआरपीएफ चे उपनि/बासुमलारी एसआरपीएफ चे पोउपनि/ जगताप तसेच उप पोस्टे चे सर्व पो.अधि/अंमलदार तसेच सीआरपीएफ जी कंपनी ९ बटालियनचे सर्व पो. अधि/पो.अंमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोशि/१२२२ श्रीहरी बडे यांनी केले.

सदर जनजागरण मेळाव्या करिता पोस्टे हद्दीतील लहान ,थोर, प्रतिष्ठित असे जवळपास १५० नागरिक उपस्थित होते. जमलेल्या सर्व नागरिकांना सीआरपीएफ जी कंपनी ९ बटालियन व उप पोलीस स्टेशन दामरंचा च्या वतीने कृर्षी उपयोगी फवारा पंप, फाव़डे, विळा, खुर्पे, टिकास, बादली तसेच खेळाचे साहित्य – कॅरम बोर्ड सेट ,क्रिकेट बॅट, टेनिस बॉल,स्टम्प,व्हॉली बॉल,व्हॉलीबॉल नेट आशाप्रकारचे साहित्याचे वाटप करण्यात आले.

पोस्टे हद्दितील नागरीकांनी सीआरपीएफ तसेच गडचिरोली पोलीस यांचे खुप आभार मानले.

तसेच गडचिरोली पोलीसांनी दादालोरा खिडकीच्या माधयमातुन जी सेवा दिली जात आहे त्याबद्दल नागरीकांनी गडचिरोली पोलीसांचे मनस्वी आभार मानले.

हे देखिल वाचा : 

शासकीय आश्रमशाळेतील तब्बल १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा

नक्षल्यानी नवनिर्माण रस्ते बांधकामावरील एक जेसीबी, टँकरची केली जाळपोळ

 

 

Comments are closed.