Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जातीय दंगली घडविणे हा भाजपचा इतिहास आहे! – भास्कर जाधव

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

रत्नागिरी, दि. ४ सप्टेंबर :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या सर्व नेत्यांना त्यांनी राज्य व्यापी दौरा करून शिवसेना भक्कम करण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी काल गुहागर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात ते कार्यकर्त्याना संबोधित होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना संपविण्याचे सर्व मार्ग संपले आहेत. म्हणून आता महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शेवटचा उपाय म्हणून जातीय दंगली महाराष्ट्रात घडविण्याचा भाजपचा डाव आहे. जातीय दंगली घडविण्याशिवाय भाजपकडे पर्याय उरला नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
मुस्लिम समाजासह इतर जातीधर्मातील सर्व लोकांना उद्धव ठाकरेंच्या सौम्य आणि सभ्य नेतृत्वाची भुरळ पडली आहे.आणि हेच दुःख भाजपला पचनी पडत नाही आहे. भाजपने शिंदे च्या मदतीने ४० आमदार फोडले पण ४ लाख लोकं आज प्रत्येक ठिकाणी शिवसेंनेच्या मागे उभी आहेत. त्यामुळे भाजप जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न करू शकते.असे ते शेवटी म्हणाले.

हे देखील वाचा: 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कु.मीनल दिवाकर रामटेके यांची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.