Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नकली गांधी आडनावाने कोणी “महात्मा” बनत नाही!

शिवराय कुळकर्णी यांचा अमरावतीच्या पालकमंत्र्यांवर पलटवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, 26 डिसेंबर: आलूसे कभी सोना नही बनता.. नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनत नाही… सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपत नाही आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलत नाही, हे गांधी घराण्याची गुलामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी ध्यानात घ्यावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि प्रियंका रॉबर्ट वाड्रा यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या काँग्रेसी गुलामांनी शेतकरी हिताचा पुळका दाखवू नये. काँग्रेसच्या सत्ताकाळात रॉबर्ट वाड्रा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्याचा इतिहास ताजा आहे. काँग्रेसने नाहक पुतनामावशीचे प्रेम दाखवू नये.  जो पक्ष एका घराण्याच्या गुलामगिरीच्या आणि चाटूगिरीच्या मानसिकतेत अडकला आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. स्वतःचेच तोंड स्वतःच्याच थुक्याने मलिन करण्याचा प्रकार असल्याची टीकाही शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर मुक्ताफळे उधळली आहेत. गांधी घराण्याशी आपण किती एकनिष्ठ आहोत, हे दर्शवण्याची स्पर्धा कॉंग्रेसजनांमध्ये कायम सुरू असते. त्यात यशोमती ठाकूर कायम आघाडीवर असतात. मोदींवर टीका करून काँग्रेसमध्ये आणखी वरचे पद मिळते, या अनुभवातून यशोमती ठाकूर आपल्या मंत्रीपदाची चुणूक दाखवण्या ऐवजी रोज नित्यनेमाने मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत असतात. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका. स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि सर्वांना कर्जमाफीचा लाभही नाही. राज्यात रोज सर्वत्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यशोमती ठाकूर यांनी प्रथम त्यावर लक्ष द्यावे. त्यांनी प्रथम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या व राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या समस्या सोडवून दाखवाव्या, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे वाचा – शासकीय कर्मचाऱ्यांना घालावे लागणार दर शुक्रवारी खादीचे कपडे

Comments are closed.