Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करा; ‘बार्टी’ चे विद्यार्थ्यांना आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २१ नोव्हेंबर : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या वेग मंदावला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेल आहे. त्यामुळे विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करणेबाबत बार्टी कडे विनंती केलेली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने, अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिनांक १७ ते २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सुचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही ही बार्टी मार्फत दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आली आहेत. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील बघा :

 

 

Comments are closed.