Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशातील काही राज्यात पावसाचा कहर! मुसळधार पावसाने घेतला अनेकांचा बळी, १५ हजारांहून अधिक नागरिक बेघर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, २१ नोव्हेंबर:  देशातल्या काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार कहर केला आहे. शनिवारी दक्षिणेकडील राज्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाचा (Rain Alert) जोर कायम होता. या पावसाचा फटका आंध्र प्रदेशला सर्वाधिक बसला आहे. आंध्र प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये सर्वाधिक जीवितहानी तसेच बरेच नुकसान झाले आहे.

त्याचवेळी, केरळमधील सबरीमाला येथे पावसाचे प्रमाण कमी झाले होते, जिथे पथनामथिट्टा जिल्हा प्रशासनाने पावसामुळे तीर्थयात्रेवरील बंदी उठवली. दुसरीकडे, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शुक्रवारपासून झालेल्या पावसामुळे आंध्र प्रदेशातील कडप्पा आणि अनंतपुरमु जिल्ह्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये १७ हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका सदस्याचाही मृत्यू झाला आहे. कडप्पा जिल्ह्यातील चेयेरू नदीला शुक्रवारी आलेल्या पुरात ३० हून अधिक लोक वाहून गेले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तिरुपती शहरातील परिस्थिती अजूनही भीषण आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.

स्कायमेट हवामानानुसार, रविवारी तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटक (Karnataka) आणि रायलसीमाच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच आज केरळ (Kerala) , तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे (Andaman and Nicobar Islands),किनारी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) , दक्षिण छत्तीसगड, कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यासोबतच ओडिशा, लक्षद्वीप, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

हे देखील वाचा :

मोदी सरकारचा …या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बसणार फटका; नव्या वर्षात कपडे-चप्पलच्या वाढणार किंमती

धक्कादायक!! युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून चक्क विषप्राशन करून केली आत्महत्या!

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

 

Comments are closed.