Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड २० नोव्हेंबर :जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दोन तरुणांचा पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती करत उरण ते गोवा सायकल प्रवास सुरू केला असून त्यास रायगड वासियांनी  उत्तम प्रतिसाद दिला. जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत.

त्याकरिता प्लास्टिक बंदी किती महत्वाची आहे या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरणमधील विवेक मेघश्याम भगत व रोहा तालुक्यातील सूरज शरद खांडेकर हे दोन तरुण सायकलवरून उरण ते गोवा समुद्र असा ६५० किलोमीटर प्रवास करत आहेत.पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विवेक भगत, सुरज खांडेकर य दोन तरुणांनी उरण ते गोवा असा सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर सायकलने प्रवास करण्याचा संकल्प केला व त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१८ नोव्हेंबर रोजी त्यांनी उरण चारफाटा येथून गोवा येथे प्रस्थान केले असून आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्यातून पुढे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. एकूण ६ दिवसाचा हा प्रवास असून २३ तारखेला ते गोव्याला सायकल वरून प्रवास करत पोहोचतील.तसेच त्यांना पुढे जमले तर गोव्याच्या पुढे कर्नाटक राज्यात देखील  काही किलोमीटर सायकल वरून प्रवास करत दक्षिण भारतातील नागरिकांना पर्यावरण वाचविण्यासाठी  जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे.

 

“‘ दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण, प्लास्टिकची समस्या, समुद्रात जमा होणारा प्लास्टिक चा  कचरा, समुद्रातील विविध जैव प्रजातींचे होणारे नुकसान यासाठी नागरिकांना  प्रदूषण विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे “‘ सायकलस्वार विवेक भगत, सूरज खांडेकर यांनी सांगितले.सदर उपक्रमाचे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खा. रजनीताई पाटील

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

 

 

Comments are closed.