Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

नांदेड जिल्हयातील जांब( बु ) जवळील कंधार - जांब या राज्य महामार्गावरील घटना. अपघातात पत्नी-पत्नीसह ३ जण जागीच ठार, एक जखमी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. २० नोव्हेंबर : नांदेड जिल्हयातील जांब ( बु ) जवळील कंधार – जांब या राज्य महामार्गावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत वृध्द पती- पत्नीसह तीन ठार तर एक जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात दुचाकीवरुन फुलाबाई राठोड (५५), सुर्यकांत राठोड (६०), संजना राठोड (३) यापैकी दुचाकीवरील संजना राठोड ही चिमुकली जखमी झाली असुन दोघे जागीच ठार तर फुलाबाई राठोड हया जांब बु प्रा.आ.केंद्रात उपचार घेत असतांंना मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, पोलिस निरीक्षक गजानन काळे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकुर, किरण वाघमारे, मारोती मेकलेवाड घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला.

प्राप्त माहितीनुसार घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जांब बु प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खा. रजनीताई पाटील

कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ

 

Comments are closed.