Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

चिमुर येथील कोलारा गेटजवळील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

देशात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असल्याने जगभरातून पर्यटक आवडीने पसंती दर्शवितात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जवळपास १८ गेटची निर्मिती केली आहे. त्यामुळे पर्यटकांना तसेच व्याघ्र प्रकल्प जवळ असलेल्या गावातील नागरिकांना याच गेटवरील रस्त्यांचा आधार घेऊन जावे लागते. मात्र रस्त्यालगतच चक्क महिला वनरक्षकास वाघाने भक्ष केल्याने वनविभागात खळबळ उडाली असली तरी याच रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने पर्यटकासह येणाऱ्या- जाणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चंद्रपूर, दि. २० नोव्हेंबर : कोलारा वनपरिक्षेत्रातील कोअर झोन मधील कक्ष क्रमांक ९७ मध्ये ट्रांसेक्ट लाईनचे वनरक्षक व चार वनमजुरासह काम करीत असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिला वनरक्षकावर हल्ला करून काही अंतरापर्यंत ओढत नेले. त्यावेळी सोबत असलेल्या चार वनमजुरांनी वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आरडाओरडही केला. मात्र वाघाने अधिक आक्रमकता दाखविल्याने मजूरही हतबल झाले असून महिला वनरक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोलारा वनपरिक्षेत्रात घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेत मृत झालेल्या महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढूमणे (४३) असून कोलारा वनपरिक्षेत्रात कार्यरत होत्या. सध्या देशातील सर्वच वनामध्ये व्याघ्र, पशु, प्राणी गणनेसाठी वनविभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. आणि याच नियोजनातील पहिली पायरी म्हणजे ट्रांसेक्ट लाईनचे काम करीत असतांना वाघाने अचानक हल्ला करून ठार केल्याने वनविभागातील कर्मचाऱ्यांत मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सदर घटनेची माहिती कोलारा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांना वनमजुरांनी दिली असता क्षणाचाही विलंब न करता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना दिली  त्यांनी घटनेचे गाभिर्य ओळखून  तात्काळ घटनेस्थळी वनाधिकारी कर्मचाऱ्यासह धाव घेत वनामध्ये शोधमोहीम राबवित असतानाच  वनामध्ये महिला वनरक्षकांचा मृतदेह आढळून आला.  वनविभागाच्या अधिकार्यांनी  मोका पंचनामा करून घटनेची माहिती चिमूर पोलिसांना दिली असून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर या ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनाचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आत्म समर्पितांच्या नवजीवन उत्पादक संघ उत्पादित फिनाईल चा लोकार्पण सोहळा संपन्न

 

 

Comments are closed.