Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बौद्ध धम्म रॅलीला भिक्खू आणि उपासकांची मोठी उपस्थिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धम्म चळवळ गतिमान होण्यासाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था काम करत असून धम्म प्रचार आणि प्रसार जोमाने व्हावा या हेतूने धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भिक्खू धम्मशील यांनी दिली.

बीड, दि. २० नोव्हेंबर : बीड येथे अखिल भारतीय दुसरी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून आज धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बौद्ध धम्म रॅलीला सुरुवात करण्यात आली. पंचरंगी ध्वज हातात घेऊन आणि पांढरे शुभ्र कपडे घालून बौद्ध उपासकांनी मोठी उपस्थिती दर्शविली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीड शहरात निर्माण झालेल्या प्रियादर्शी धर्मसंस्कार शिक्षण संस्थेने बीड जिल्ह्याला ऐतिहासिक बौद्ध वारसा प्राप्त असणाऱ्या शिवनी या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी ३ एक्कर जागा विकत घेऊन या ठिकाणी भव्य संस्कार केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवनी येथे १९७७ मध्ये जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध बौद्ध भिक्कू डॉ. आनंद कौसल्यायन महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदिक्षा सोहळा पार पडला होता. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून २० ते २५ हजार उपासक उपस्थित राहिले होते. या सोहळ्याचे साक्षीदार उपासक आजही त्या गावात आणि बीड जिल्ह्यात आहेत.

त्यावेळी पूज्य भदंत यांच्या हस्ते एका बोधीवृक्षाचे वृक्षारोपण केले होते. तो बोधिवृक्ष आजही इतिहासाची साक्ष देत येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान बनत आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवनी येथे आज अखिल भारतीय दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. या धम्म परिषदेला बाहेर देशातून भिक्खू गण आले होते.

हे देखील वाचा :

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खा. रजनीताई पाटील

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

 

 

 

Comments are closed.