Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाढदिवसाच्या दिवशी तलवारी घेऊन फोटो काढत भाईगिरी करने व त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला भोवले

या प्रकरणी भंडारा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

भंडारा, दि. ३ सप्टेंबर : वाढदिवसाच्या दिवशी तलवारी हातात घेऊन फोटो सेशन करून भाईगिरी करत त्याला व्हाट्सएप वर वायरल करने दोन युवकाला चांगलेच भोवले असून ह्या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भंडारा तालुक्यातिल भोजापुर येथील सुभाष वार्डत संबधित घटना घडली असून ह्या प्रकरणी निखिल उर्फ निकेश अंकुश बावने वय 22 वर्ष व गणेश राजेश बागडे वय 20 वर्ष यांच्यावर भारतिय हत्यार कायदा 1959 कलम 5 ,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तलवारी जप्त करण्यात आल्या आहे.

23 अगस्त ला आरोपी निखिल उर्फ निकेश अंकुश बावने व गणेश राजेश बागडे ह्या दोघांच्या वाढदिवस होता. घटनेच्या दिवशी आरोपीनि भोजापुर येथील सुभाष वार्ड वाढदिवस साजरा करत असतांना केक कापन्यासाठी तलावारिचा वापर केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवाय तलवारी घेऊन त्याचे फोटो सेशन केले इतकेच नाही तर चक्क त्याचे फोटो व वीडियो वायरल केले. याचे फोटो वीडियो वायरल झाल्यावर भंडारा पोलिसांनी यांची गंभीर दखल घेत काल 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करत दोन लोखंडी तलवारी जप्त केल्या आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी भाईगिरी करने युवकांना भोवले आहे.

हे देखील वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२०-२१ च्या शिक्षकांची नावे जाहिर

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित झाल्याने राज्य उजळणार – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.