Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू... चिंता करू नका लवकर बरे व्हा, हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ठाणे, दि. ३ सप्टेंबर : ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज दिल्या.

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे.. ताई तुम्ही काळजी करू नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका फक्त लवकरात लवकर बरे व्हा, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी  कल्पिता पिंपळे यांची विचारपूस केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृती बाबत माहिती घेत असतात. आज त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून कल्पिता पिंपळे यांच्याशी संवाद साधला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. कल्पिता पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

‘मातृ वंदना सप्ताह’ चा गडचिरोली जिल्ह्यात शुभारंभ

वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेमुळे वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर – वनाधिका-यांसह कर्मचा-यांचा मुख्यालयाला खो!

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२०-२१ च्या शिक्षकांची नावे जाहिर

 

Comments are closed.