Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२०-२१ च्या शिक्षकांची नावे जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. २ सप्टेंबर : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२०- २१ च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज (दि.०२ सप्टेंबर २०२१) रोजी दुपारी, पहिला माळा, स्थायी समिती सभागृह, महापालिका मुख्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहिर केली.
याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते  विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, शिक्षणाधिकारी (प्रभारी) राजू तडवी तसेच सबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत,त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन-१९७१ पासून ०२ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली. तदनंतर वेळोवेळी यामध्ये बदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने ” गौरविण्यात येते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत असिधाराव्रत स्विकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी रु.१०,०००/- (ECS द्वारे ) ,बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक , प्रमाणपत्र,शाल,श्रीफळ व फेटा देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

दिनांक – २३.०८.२०२१ ,२४.०८.२०२१ व २५.०८.२०२१ या कालावधीत निवड समितीने सिटी ऑफ लाँस एंजलिस मनपा शाळा, मनमाला टँकरोड, स्टारसिटी सिनेमा जवळ, माहीम -माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे १३० शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सन- २०२०-२१ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १३० शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सन-२०२०-२१ साठी पुरस्कार प्राप्त झालेले माध्ममनिहाय शिक्षकांच्या नावांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित झाल्याने राज्य उजळणार – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य नाटय स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाटय स्पर्धा असे नाव देण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

2 Comments
  1. Hairstyles Women says

    Hi there! Quick question that’s completely off topic. Do you know how to make your site mobile friendly? My blog looks weird when viewing from my iphone. I’m trying to find a template or plugin that might be able to resolve this problem. If you have any suggestions, please share. Appreciate it!

    1. loksparshadmin says

      yes…

Comments are closed.