Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे अभिवादन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि.३१ ऑक्टोबर : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री श्रीमती, इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोलीतील वनसंरक्षक निवासस्थान परिसरात वन अधिकारी,कर्मचार्यांच्या वतीने  वनवसाहतीत  अभिवादन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मा.डॉ किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली, डॉ कुमारस्वामी उपवसंरक्षक,सोनल भडके सहाय्यक वनसंक्षक यांनी स्व. पटेल आणि स्व. गांधी यांच्या प्रतिमांना दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त शपथ देवून महापुरुषांबाबत आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
 या कार्यक्रमाचे औचित्य साधून  वन अधिकारी ,कर्मचारी यांच्या वतीने  व वसाहत परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवून एकतेचा संदेश देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सोनल भडके सहाय्यक वनसंरक्षक यांनी केले. तर कार्यक्रमाकरिता नियोजन सहकार्य अरविंद पेंदाम वपअ गडचिरोली ,श्रीकांत नवघरे, अंजली बोरावर , अरूप कन्नमवार, उमेश बोरावार,नितेश सोमलकर ,अजय कुकूडकर होमदेव कुरवटकर, निखिल बारसागडे,राजू दुर्गे, धर्मराव दुर्गमवार, भारत राठोड, रुपेश मेश्राम , खुशाल भसारकर ,सुनील दाते ,संदीप रामटेके, सिद्धार्थ मेश्राम, नितेश टेकाम, मकसूद सय्यद, कुणाल निमगड़े इत्यादि व गडचिरोली वनपरिक्षेत्रातील आदी वन अधिकारी व वन कर्मचारी यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा,

आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.