Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लसीकरण मोहिमेसाठी प्रोजेक्ट ,मुंबई संस्थेचे गडचिरोली जिल्हाला सहकार्य

कोरोना प्रतिबंधाकरिता समूह प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण आवश्यक,आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क दि. 5 : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सहभागासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई या संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. जाणीव जागृती बरोबरच नागरिकांचे समुपदेशन करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहे.

त्यासाठी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली आणि प्रोजेक्ट मुंबई संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमास प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशीर जोशी, गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला, सर्च संस्थेचे विश्वस्त डॉ.आनंद बंग, डॉ.हर्षा वशिष्ठ आदी यावेळी उपस्थित होते.

        गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून या भागात लसीकरण मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे या भागात जाणीवजागृती करत समुपदेशनाच्या माध्यमातून लसीकरणात सहभागी होण्यासाठी प्रोजेक्ट मुंबई संस्था प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून त्यांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी आणि आरोग्यविषयक गावांना सक्षम करण्यासाठी आरोग्य स्वराज्य योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

  यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून समूह प्रतिकार शक्ती निर्माण होण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे काळाची गरज आहे. जागतिकस्तरावर देखील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे तेथे तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरण प्रभावी असून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचे समुपदेशन करतानाच त्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे लसीकरण प्रभावी असून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचे समुपदेशन करतानाच त्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रोजेक्ट मुंबईचे श्री.जोशी, सर्चचे डॉ.आनंद बंग यांनी मनोगत व्यक्त केले.

 हे देखील वाचा,

बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे यांना वीरमरण

एटापल्ली मध्ये अनाधिकृतपणे सुरु असलेली क्लीनिकल लेबॉरटरीला ठोकले कुलूप

भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.