Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एटापल्ली मध्ये अनाधिकृतपणे सुरु असलेली क्लीनिकल लेबॉरटरीला ठोकले कुलूप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. ५ ऑगस्ट : अतिदुर्गम,आदिवासीबहुल व   नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली मध्ये अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी चालवीत असल्याने  तहसीलदार यांचे आदेशान्वये मुख्याधिकारी नगर पंचायत यांनी शर्वरी क्लीनिकल लेबॉरटरी या अनाधिकृत क्लीकल लेबॉरटरीचे संचालक प्रभाकर दुर्गे यांची लॅब सिल करण्यात आली असुन  महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले नाही. मात्र,लॅब सिल करण्याबाबत नगर पंचायत व आरोग्य विभागाला पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक पाटील यांनी दिली आहे.

प्रबंधक, महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांनी १० मे २०२१ ला अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी व पॅरा वैद्यक व्यावसायीक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणाय्रांवर गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पत्र पाठवलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्या नुसार गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०२१ ला जिल्ह्यातील संपुर्ण तहसीलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.

त्या नुसार एटापल्लीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी  पत्र क्रमांक अका/ सामान्य / कावी/२५३/ २०२१ अन्वये दि २० मे २०२१ ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या पत्रान्वये अनाधिकृत प्रयोगशाळा व क्लीनिकल लेबॉरटरी यांच्यावर कारवाई संदर्भात  समिती स्थापन करण्याचे आदेशित केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यांनतर परत तहसीलदार एटापल्ली यांनी पत्र क्रमांक अका सामान्य कावी-२७५ /२०२१ दि ८ जुन ला पत्र काढुन अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरीचा शोध मोहिम राबविण्यासाठी पत्र काढाले होते.

तथापी दि १३ जुलै २०२१ ला मंडळ अधिकारी एटापल्ली यांनी आपले प्रतिवेदन सादर केल्या नंतर एटापल्ली तालुक्यात व नगर पंचायत क्षेत्रात सुरु केलेल्या क्लीनिकल लॅब व प्रयोगशाळा सुरु करणे संदर्भातील सर्व आवश्यक मुळ दस्ताऐवजासह दि १४ जुलै २०२१ ला तहसीलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरिय कोरोणा सनियंत्रण समिती यांनी एटापल्ली मध्ये सुरु असलेल्या क्लीनिकल लेबॉरटरींना पत्र क्रमांक कार्या/अका/ सामान्य/ कावी-३३२ /२०२१ दि १३ जुलै २०२१ ला नोटीस बजावली होती.

त्यांनतर तहसीलदार शेवाळे यांनी २० मे ला गठीत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी, मुख्याधिकारी , तालुका वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक व पोलीस निरिक्षक यांना पत्र क्रमांक कार्या /अका /सामान्य /कावी-३३६/ २०२१ दि १५ जुलै २०२१ ला पुन्हा आदेश काढुन सिल करण्याबाबत कळविले होते.

त्यानुसार  बुधवारी ४ ऑगस्टला दुपारी मुख्याधिकारी नगर पंचायत एटापल्ली यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार शेवाळे यांच्या आदेशान्वये श्रीराम डाके प्रशासकिय अधिकारी नगर पंचायत एटापल्ली लिपीक दुर्गे, तलाठी पंकज उसेंडी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जगदिश राठोड समितीच्या सर्व सदस्यांसह शर्वरी क्लीनिकल लेबॉरटरीचे संचालक प्रभाकर दुर्गे हे महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या कलम २६ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरल्याने अनाधिकृत क्लीनिकल लेबॉरटरी सिल करुन लॅब मधील सामान जप्त करण्यात आहे .

गुन्हा दाखल केलाच नाही,

महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या कलम २६ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र सादर न करणाय्रांवर कलम ३१ व ३२ अन्वये  गुन्हा दाखल करण्याबाबत महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेचे प्रबंधक यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते, त्यानुसार समितीच्या सखोल चौकशीत प्रभाकर दुर्गे हे दोषी आढळुन देखिल गुन्हा दाखल न करताच केवळ अनाधिकृत क्लीनिकल लॅब केवळ सिल करुन मोकळे झाल्याने एकुणच कारवाई वर शंका उपस्थीत केली जात आहे.

हे देखील वाचा ,

भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा

बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे यांना वीरमरण

मोठी बातमी… MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,

Comments are closed.