रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन २ कोटी ७५ लाखाचा धनादेश शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला सुपूर्द.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ०९ नोव्हेंबर: रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या वेतनाची २ कोटी ७५ लाख ९२ हजार आठशे एकोणवीस इतक्या रक्कमेचा धनादेश राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केला.

कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments are closed.