Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघात रोहित शर्माचा समावेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. ०९ नोव्हेंबर: येत्या 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयला मेडिकल टीमकडून खेळाडूंचे दुखापत अहवाल आणि अपडेट्स मिळाल्यानंतर निवड समितीने हे बदल केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियातील पहिल्या अँँडीलेड कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयकडून विराटला पॅटर्निटी लीव्ह मंजूर झाली आहे.

बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहित शर्माच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी याबाबत निवड समितीला कळविले आहे. रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात रोहितचा समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसनला निवड समितीने भारताच्या एकदिवसीय संघात अतिरिक्त विकेटकीपर म्हणून सामील केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.