Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसई – विरारच्या मॅरेथॉन स्पर्धेचे बिगुल वाजले

शहर महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत ५४ लाखाहून अधिक बक्षिसांची खैरात.. राष्ट्रीय स्तरावरील धावपटू भाग घेणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विरार, दि. २२ नोव्हेंबरराष्ट्रीय स्थरावर नावाजलेली मॅरेथॉन स्पर्धा म्हणून वसई -विरार च्या मॅरेथॉन स्पर्धेचा उल्लेख केला जातो. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील अनेक धावपटू भाग घेतात. या मॅरेथॉन स्पर्धेचे हे १० वे वर्ष!

कोरोनामुळे मागील दोन वर्षात वसई विरार मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी मागील मॅरेथॉन स्पर्धेप्रमाणेच यावर्षी दुप्पट जोमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेत २१००० हुन अधिक स्पर्धक धावणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील स्पर्धेच्या वेळी १८००० स्पर्धक धावले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मॅरेथॉन स्पर्धेला वसई विरार महानगरपालिकेला वसई कला क्रीडा मंडळाचे फार मोठे योगदान लाभले आहे. ४२ किलोमीटर साठी प्रथम पारितोषिक ३लाख रुपये, अर्ध मॅरेथॉन साठी प्रथम पारितोषिक २ लाख रुपये असणार आहे तसेच शालेय विद्यार्थी, ५० वर्षांवरील, जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीही १ ते ३ किलोमीटर च्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेचा ब्रँड ऍम्बेसेंडर म्हणून आलिम्पिकपटू अविनाश साबळे असणार आहे.

या स्पर्धेच्या नियोजनासाठी ८ प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. वैदयकीय सेवेसाठी, कार्डियोलॉजिस्ट, ४० डॉक्टर , रुग्णवाहिका आदी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट छायाचित्रीकरणासाठी ,प्रथम,द्वितीय, तृतीय असे अनुक्रमे १५०००/- ,१०,०००/-, ५,०००/- रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक धावपटूसाठी टी -शर्ट , मेडल, सर्टिफिकेट , बॅग देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच ज्या स्पर्धकाचा धावताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यावर्षी २८ लाखांची बक्षिसाच्या रकमेत वाढ झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, एनएसबी चे कमांडो, तसेच पोलीस सुद्धा या स्पर्धेत धावणार आहेंत. जुन्या मार्गप्रमानेच ही स्पर्धा होणार असून आरोग्य, पाणी, एनर्जी ड्रिंक्स, याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा, वैदयकीय सेवा कामाला लागल्या असून संपुर्ण तयारी झाली आहे. नागरिकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सर्व जनतेस केले आहे.

हे देखील वाचा : 

भोकर तालुक्यात शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन…

 

रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली,रोहा दिवा नवीन गाडी रुळावर,रोहेकरांच्या एकजुटीचे फलित

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.