Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीस माकडे अडकले ‘त्या’ पाण्यातील झाडावर अन् वनविभाग मात्र झोपेतच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावती : जिल्ह्यात दहा तारखेला दर्यापूर तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी झाली होती. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले होते. अनेक शेतात तुडुंब पाणी साचले होते. तसेच नदी-नाले एक झाले होते. त्यातच सांमदा सौंदळी प्रकल्प सुद्धा पाण्याने तुडुंब भरला आहे. त्या प्रकल्पामध्ये चिंचेच्या झाडावर वीस ते बावीस माकडे अडकल्याचे आज समजले आहे.

आणि यामध्ये चिंचेचे झाड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाण्याने झाकल्या गेलेले आहे 11 जुलैपासून ती माकडे उपाशीतापाशी तिथेच बसलेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती मिळताच  उपविभागीय अधिकारी लोणकर, तहसीलदार योगेश देशमुख, आ. बळवंतभाऊ वानखडे, गजानन देशमुख, वरिष्ठ पत्रकार यांनी ही माहिती वन विभागाला दिली परंतु वन विभागांनी त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिली आहे.

परंतु वन विभागाला कधी जाग येईल आणि त्या झाडावर लटकलेले २० ते २२ माकडाची सुटका कधी होईल, अशी मागणी आता पोलीस पाटील सांमदा व ग्रामस्थांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

उद्या दुपारी एक वाजता होणार दहावीचा निकाल जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

अवनी शिकारीचा खटला पुन्हा सुरू करा; संगीता डोगरा यांची मध्यस्थी याचिका

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

 

 

Comments are closed.