Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आणखी एका ठाकरेंची होणार राजकारणात एन्ट्री ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 08,ऑक्टोबर :-  भारतात पूर्वी पासून मोठमोठ्या राजघराण्यात घरभेदीपणा होताच पुढे मोठ्या राजकारण्यांच्या घरात सुद्धा भांडणे तंटे झाले आहेत, हा इतिहास आहे. सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे घराण्यात सुद्धा आता दोन तट पडले आहेत. शिवसेनेवर एवढं मोठं संकट आलं असताना ठाकरे कुटुंबातील सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, असं म्हटलं जातंय. यानिमित्तानं एक ठाकरे प्रथमच माध्यमांसमोर झळकलेत. तेही उद्धव ठाकरेंना पाठींबा देत….!

उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे यंदा दसरा मेळाव्यात झळकले. मात्र ते एकनाथ शिंदेंच्या बीकेसी मेळाव्यात दिसून आले. ठाकरे घराण्यातील असूनही जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याने खरं तर याची तुफ्फान चर्चा रंगलीय. पण आज आणखी एका ठाकरेंच्या निर्णयाने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात. जयदेव ठाकरेंचेच पुत्र जयदीप ठाकरे यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वडिलांविरोधात मुलाने अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेतील विशेषतः ठाकरे घराण्यातील मतभेद आणखी अधोरेखित झालेत. जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे थोरले बंधू आहेत. तर जयदीप ठाकरे हे जयदेव ठाकरेंचे पुत्र असून सध्या ते परस्परांसोबत राहात नाहीत. जयदीप ठाकरे हे वांद्रे येथील मोठ्या कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहेत. जयदीप ठाकरे यांनी माध्यमांशी बातचित केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू जयदीप जयदेव ठाकरे यांनी आज प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. या निमित्ताने आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रीय होताना महाराष्ट्राला दिसण्याची शक्यता आहे.

जयदीप ठाकरे म्हणाले, मी या घराण्यातला सर्वात मोठा नातू आहे. मला उद्धव काका आणि आदित्यबद्दल आदर आहे. आजच्या अत्यंत विचित्र स्थितीत मी माझ्या कुटुंबाबरोबर असणं हे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो…
मात्र वडील जयदेव ठाकरे हे शिंदे गटात असल्याने बऱ्याच चर्चा रंगतायत. त्यावर जयदीप ठाकरे म्हणाले, ‘ मी क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. उद्धव ठाकरेंना वाटलं, माझ्यावर एखादी जबाबदारी टाकावी, तर ती मी स्वीकारेन. पक्षाला वाढवायला मी नक्की मदत करेन…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :- 

१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक !

राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.