Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचा वनविभागात वन्यजीव सप्ताहाचे यशस्वी आयोजन .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 08,ऑक्टोबर :- दरवर्षी संपुर्ण भारतात 1 ते 7 ऑक्टोंबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त याही वर्षी वन्यजीव सप्ताह सिरोंचा वनविभागातील सर्व आठ वनपरिक्षेत्रात साजरा केला गेला. सिरोंचा वनविभागातील पाणी व जंगल मोठया क्षेत्रावर आहे व त्यामुळे प्राणी, पक्षी, वनस्पती किटक यांची जैवविविधता मुबलक आहे. सदर वनविभागात प्राणहिता अभयारण्य व कोलामार्का अभयारण्य हे संरक्षित क्षेत्रे तसेच 8 हत्तीचा समावेश असलेला कमलापूर शासकीय हत्ती कॅम्पचा समावेश आहे. विशेष करुन कमलापूर व देचली वनपरिक्षेत्रात दुर्मिळ होत असलेल्या गिधाडांचा अधिवास देखील आहे. सिरोंचा वनविभागाच्या जंगलात राज्यप्राणी शेकरु, बिबट , अस्वल , चितळ, अजगर व विविध सर्प, गरुड, कवडे, रानकोबंडे, हरिअल, पाखुर्डी, धीवट असे विविध पक्षी आढळतात. त्याचबरोबर स्थलांतरण करुन येणारे वाघ ही इथे आढळतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वरिल वन्यजीवांची विविधतेबद्दल व त्यांचे रक्षण करण्यासाठी सर्व वनपरिक्षेत्रात रॅली काढून, शाळामध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजन करुन, प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त गावकऱ्यापर्यंत व शाळकरी मुलांपर्यंत पोहचून वन्यजीव अधिवास व वन्यजीव वाचविण्याचा संदेश दिला. तसेच वनविभागातील 40 शाळांमध्ये सिरोंचा जंगलातील वन्यजीवांची माहिती पुरविणारे 500 बोर्ड पोस्टर्स लावण्यात आले. या उपक्रमातून शाळकरी मुलांमध्ये वन्यजीव व जंगल यांच्याबद्दल कुतूहल व आपुलकी निर्माण होईल व भावी काळात ते वन्यजीव व वने संवधर्नात सक्रिय भाग घेतील.

सदर कार्यक्रमामध्ये आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तोकला, बामणी वनपरिक्षेत्राचे प्रफुलचंद्र झाडे, कमलापूर वनपरिक्षेत्राचे विकास भोयर, प्राणहिता वनपरिक्षेत्राचे संजोग खरतळ, झिंगानुर वनपरिक्षेत्राचे सागर बारसागडे , जिमलगट्टा चे वनराज नगराळे, सिरोंचा प्रमोद पाझारे यांनी पुढाकार घेवून संबधित वनपरिक्षेत्राचे वनकर्मचारी यांचे सहभागातून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

आणखी एका ठाकरेंची होणार राजकारणात एन्ट्री ?

१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक !

Comments are closed.