Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ०८, ऑक्टोबर :- गडचिरोली पोलिस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शुक्रवारी दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते अधिक चौकशी अंती नक्षलवादी असल्याचे निष्पन झाल्यावर त्यांना धानोरा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे अटक करण्यात आली आहे . अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे सनिराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे रा.मोरचुल ता. धानोरा व समुराम उर्फ सूर्या नरोटे असे असून दोघांवर शासनाकडून 10 लाखांचे बक्षीस होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी शनिवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार सनिराम नरोटे हा ऑक्टोबर 2015 पासून टिपागड दलममध्ये सामील होऊन डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होता त्याच्यावर खून , जाळपोळ, चकमकअशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता .शासनाकडून त्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस ठेवले होते.
समुराम नरोटे हा जनमिलिशिया दलमचा सदस्य होता. नक्षलवाद्यांचा खून,जाळपोळ,चकमकी आदी.गुन्हात सहभागी होता शासनाने त्याच्यावर 2 लाखाचे बक्षीस ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून वरिष्ठ नक्षलवादी कॅडर कडून त्यांना उत्तर गडचिरोली मध्ये नक्षल चळवळी बाबत माहिती घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. अशी माहिती पोलीस चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांनी दिली आहे.

या दोघांच्या अटकेमुळे उत्तर गडचिरोली मध्ये नक्षलवाद्यांना पुन्हा पाय रोवण्याच्या इराद्याला आळा बसला असल्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. या पत्रपरिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अहेरी चे अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :- 

नारीशक्ती पुरस्करासाठी अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे

Comments are closed.