Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

  •  – गडचिरोली तालुक्यातील आठवडाभरातील दुसरी घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २५ डिसेंबर : गडचिरोली शहरानजीक झुडपी जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य असून येथे सरपनासाठी जाणाऱ्या महिलांवर हल्ला करुण जागीच ठार करीत असल्याने गडचिरोलीत तसेच शहरानजीक च्या गावात दहशत निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली असून आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

16 डिसेंबर रोजी गडचिरोली शहरालगत असलेल्या चांदाळा मार्गावर झुडपी जंगलामध्ये वाघाने इंदिरानगर येथील महिलेवर हल्ला करुण ठार केल्याची घटना ताजी असतानांच आज 25 डिसेंबर रोजी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगाव येथिल सरपनासाठी गेलेल्या महिलेवर अचानक हल्ला केल्याने जागीच मृत्यु झाली. सदर घटना 2:00 च्या सुमारास घडली असून मृतक महिलेचे नाव मंजुळाबाई बुधाजी चौधरी (62)असे आहे. सदर महिलाही सरपण गोळा करण्यासाठी गावाजवळील जंगलात सरपण गोळा करीत असतांना अचानक वाघाने मंजुळाबाई वर हल्ला केला यात जागीच त्यांचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती होताच वनविभाग वडसा अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला येथील वनाधिकारी घटनेची अधिक माहिती व तपास करीत असून वाघाच्या होणाऱ्या घटनेमुळे दहशत निर्माण झालेली आहे. वाघाचा लगेच बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे..

Comments are closed.